निवड समितीवर ढेपे, संगवे, जाधव, चपळगावकर
अलताफ कडकाले (सोलापूर) - 'खेलो इंडिया युथ गेम्स' विभागीय खो खो स्पर्धा गुरुवारी ( दि. २ डिसेंबर) नेहरूनगर शासकीय मैदानावर होतील. या स्पर्धेत सोलापूरसह पुणे व अहमदनगर येथील विजेते संघ भाग घेणार आहेत. विजेते संघ राज्य स्पर्धेत भाग घेतील.
या स्पर्धा संपल्यानंतर निवड चाचणी होईल. राज्य चाचणीसाठी जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती सदस्य खेळाडू निवडतील. त्या सदस्यांची नियुक्ती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे पुणे विभागीय उपसंचालक प्रमोदिनी अमृतवाड यांनी केली आहे.
या निवड समिती सदस्य असे आहेत. श्रीकांत ढेपे ( शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते), अजितकुमार संगवे ( राष्ट्रीय खेळाडू), सत्येन जाधव व सुधीर चपळगावकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक). तीनही सदस्य क्रीडा क्षेत्रातील दिग्गज आहेत. या स्पर्धेचे अपडेट आपल्याला MBP Live24 वर मिळत राहतील.
खो - स्पर्धैत बुधवारी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाने अंतिम स्पर्धेत एकहाती सामने जिंकून विजेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे खो-खो या खेळाला पुन्हा एकदा क्रीडा रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता सोलापूुरात स्पर्धा होत आहेत.