अलताफ कडकाले ( MBP Live24) - भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या एका गोलंदाजाने एकाच डावात १० गाडी बाद करून भारतीय संघाचा धुव्वा उडवला आहे. एकाच डावात १० गाडी बाद करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.
न्यूझीलंडच्या त्या खेळाडूचे नाव एजाज पटेल आहे. या पूर्वी भारताच्या अनिल कुंबळे व जिम लेकर यांनी हा विक्रम केलेला आहे. एजाज याने आता त्यांची बरोबरी साधली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा गोलंदाज एजाज पटेल याने इतिहास रचला. एका डावात एजाजने १० बळी घेण्याचा पराक्रम केला. याआधी भारताच्या अनिल कुंबळे याने पाकिस्तान विरोधात एका डावात १० बळी घेतले होते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टमध्ये हा विक्रम झाला आहे. एजाज देखील फिरकीपटू गोलंदाज आहे. टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमधील सर्व १० विकेट्स पटेल याने घेतल्या आहेत. पटेल याने पहिल्या दिवशी ४ गडी बाद केले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशीही भेदक गोलंदाजी करत उर्वरित सर्व ६ गडी बाद केले.
या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. एका इनिंगमध्ये १० फलंदाज बाद करणारा तो क्रिकेट विश्वातील तिसरा गोलंदाज बनला आहे. एझाझ याने आतापर्यंत ९ कसोटी सामने, ७ ट्वेन्टी ट्वेंटी सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केलेले आहे.
त्याचा जन्म मुंबईत झाला. वयाचा आठव्या वर्षी आईवडिलांसह तो न्यूझीलंडला रवाना झाला. वेगवान गोलंदाज म्हणून एजाज खेळत होता, पण प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार तो फिरकी गोलंदाज झाला. एजाजने तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या पाहिल्या कसोटी सामन्यातच ७ गडी बाद करून त्याने 'सामनाविर' पुरस्कार मिळवला होता.