कत्तलीसाठी आणलेल्या ७३ गाईंची सुटका

अहमदनगर - शहरात कत्तलीसाठी आणलेल्या गाईंची पोलीस पथकाने छापा टाकून सुटका केली. पोलिसांनी या अगोदर अनेक वेळा छापा टाकून देखील अशा घटना थांबायला तयार नाहीत. शनिवारी रात्री केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांनी बारा लाख रुपयांच्या ७३ गाईंची सुटका केली आहे.


याप्रकरणी अमन बाबु शेख (रा. केडगांव, नगर), अदली इक्बाल कुरेशी (रा. बाबा बंगाली, झेंडीगेट), रिजवान मुस्ताक शेख (रा. झेंडीगेट),  सलिम अकबर चौधरी (रा. तपकीर गल्ली, नगर), नजीर अहमद शब्बीर कुरेशी (रा. झेंडीगेट ), बबलु इस्माइल कुरेशी (रा. बेपारी मोहल्ला, नगर), फिरोज शमशेर शेख (रा. बेपारी मोहल्ला, नगर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे

झेंडीगेट परिसरात जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आलेली आहेत व काही जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांसाची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पहाटे पावणे तीनच्या सुमारास बाबा बंगाली येथील बंदीस्त चार पत्र्याच्या शेडमध्ये, झेंडीगेट परिसरातील एका छोटा हत्ती टेम्पो मध्ये व एका रुममध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक व दोन पंचासह वेगवेगळया वेळी छापा टाकला. 

एकुण १२ लाख ८६ हजार रुपये किंमतीची ७३ गोवंशी जातीची गावरान, जर्शी गोवंशीय गायी कालवड, वासरे व ५०० किलो गोवंशीय मास, एका गाडी, कुऱ्हाड, चाकू, सत्तुर असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी नगर पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !