अबब ! नगर जिल्ह्यात मंगळवारी ४७५ नवे कोरोनाबाधित रुग्ण, शहरात सापडले १६१ जण

अहमदनगर - मंगळवारी चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत ४७५ ने वाढ झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ६८१ इतकी झाली आहे. 


तर मंगळवारी ३३७ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ६०२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.२६ टक्के इतके झाले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १८४, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले. नगर शहरात १६१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७२, जामखेड ७, कर्जत १, नगर ग्रामीण ९, नेवासा ५, पारनेर ५,  राहाता २३, राहुरी ५, संगमनेर १५, शेवगाव ३८, श्रीरामपूर १, कॅन्टोन्मेंट ३ रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६६, अकोले १०, जामखेड ३, कर्जत २, कोपरगाव १५, नगर ग्रामीण ९, नेवासा ७, पारनेर ५, पाथर्डी ७, राहाता ३८, राहुरी ११, संगमनेर २८, शेवगाव ३, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट १ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६३ जण बाधित आढळुन आले. मनपा २३, जामखेड १, कर्जत २, कोपरगाव १, नेवासा ३, पारनेर १, राहाता १६, राहुरी ५, श्रीगोंदा ३, श्रीरामपूर ५, कॅंटोन्मेंट १ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, मंगळवारी डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०३, अकोले ७, जामखेड ५, कर्जत ३, कोपरगाव २४, नगर ग्रामीण ११, नेवासा १७, पारनेर ११, पाथर्डी ८, राहाता ५३, राहुरी १०, संगमनेर ३९, शेवगाव ९, श्रीगोंदा ७, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट ४ आणि इतर जिल्हा ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - ७७,६०२
सध्या उपचार सुरू असलेले रूग्ण - २,६८१
आतापर्यंत एकूण मृत्यू - १,१८०
एकूण रूग्ण संख्या - ८१,४६३
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !