अहमदनगर - जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दिवसभरात २४ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नगरकरांनी पुन्हा एकदा कोरोनाचा धसका घेतला आहे.
नगर शहरात १८, संगमनेर शहरात ४ जवळके (जामखेड) आणि श्रीरामपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडले. तर ९० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत नगर जिल्ह्यात
• बरे झालेले रुग्ण -२५४
• ॲक्टिव रुग्णांची संख्या - ६२
तोफखाना सिद्धार्थनगरसह शहरातील विविध भागात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके आणि महापालिका अधिकारी यांच्यासह भेट देऊन पाहणी केली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत त्यांनी सूचना दिल्या.
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी मनपा आणि पोलिस यंत्रणेला दिल्या. तसेच नागरिकांनीही सार्वजनिक संपर्क टाळावा, आजाराची लक्षणे जाणवत असतील तर आरोग्य यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.