पाच राज्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचा 'हा' ऍक्शन प्लॅन

नवी दिल्ली - आगामी पाच राज्यांच्या निवडणुका जिंकण्याचा ऍक्शन प्लॅन भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वतीने रविवारी झालेल्या बैठकित घेण्यात आला.

आगामी काळात निवडणूक होणाऱ्या पाचही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता कशी येईल याचा निवडणूक रोडमॅप बैठकीच्या माध्यमातून तयार करण्यात आतयाचे समजतेय. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिवसभर राजधानी दिल्लीतील एन डी एम सी कन्वेंशन सेंटरमध्ये बैठक पार पडली. 

या बैठकीला देशभरातील प्रदेशाध्यक्ष सोबतच राष्ट्रीय सरचिटणीस आणि भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जवळपास चार तास या बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये यावेळी भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी सर्व ते प्रयत्न करण्याचा आणि बंगाली जनतेच्या मनात उतरण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिशन हातात घेण्यात आले.

देशाच्या विकासासाठी सकारात्मक वातावरण तयार करून सर्व कार्यकर्त्यांनी नेशन फर्स्ट या पद्धतीने देशाला पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे असे बैठकीमध्ये पंतप्रधानांनी सांगितले, असे भूपेंद्र यादव यांनी स्पष्ट केलं आहे. 

सोबतच बैठकीमध्ये शेती कायद्याच्या संदर्भात सर्वसामान्यांची जागृती करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. सोबतच दिवसभर चाललेल्या या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह विविध प्रदेशाच्या प्रदेशाध्यक्षांनी राज्याचा अहवाल देखील मांडला.

संपर्क अभियान चालविणार

राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये पक्षांमध्ये सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी पक्षाने सर्व समाजातील वर्गाला जोडावे यासाठी देशभरात संपर्क अभियान चालविण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !