अलताफ कडकाले (सोलापूर) - चौथ्या खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन ५ ते १४ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत हरियाणा येथे करण्यात आलेले आहे. त्यासाठी १८ वर्षाखालील मुलींची जिल्हा बास्केटबॉल निवड चाचणी ४ ते ५ डिसेंबर दरम्यान राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे होईल.
खेळाडूचा जन्मदिनांक १ जानेवारी २००३ व त्यानंतरचा असावा. भाग घेणाऱ्या खेळाडूंनी ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उपस्थित राहावे. जिल्हयातील खेळाडूंनी आपले विहित नमुण्यातील प्रवेश अर्ज आधार कार्ड आणि जन्मतारखेचा पुराव्यासह ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कुमठा नाका सोलापूर येथे सादर करावेत.
तर प्रवेशिका dsosolapur1@amal.com या मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यासन अधिकारी सत्येन जाधव (मो. ९०२८०९५५५o), एम शफी (९८९०३५६७०७) यांच्याशी संपर्क साधावा.