अहमदनगर - माजी पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटे याच्याविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. एका पीडित विवाहित महिलेेने दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात फरार असलेल्या गोविंद मोकाटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गोविंद मोकाटे यांनी वेळोवेळी बळजबरीने घरात घुसून आपल्यावर अत्याचार केेला, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची, तसेच विरोध केेला तर बदनामी करण्याची धमकी दिली, अशी फिर्याद पीडित महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेली आहे.
रिपाइंने वारंवार पोलिस अधीक्षकांना निवेदने देऊन या गुन्ह्यात एट्रोसिटी कायद्याचे वाढीव कलम लावण्याची मागणी केली होती. या घटनेतील पीडित महिलेने नुकतेच तोफखाना पोलिसांना आपले जातीचे प्रमाणपत्र सादर केले. त्यानंतर तोफखाना पोलिसांनी एट्रोसिटी कायद्यानुसार वाढीव कलम लावले आहे.
आधी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी करत होते. आता एट्राेसिटीचे वाढीव कलम लागल्याने उपअधीक्षकांकडे तपास गेला आहे.
ही बातमीही वाचा - माजी पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
पीडित महिलेसोबत गोविंद मोकाटे याचा एक आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. याप्रकरणी मोकाटे याच्या भावाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यावरून एमआयडीसी पोलिसांनी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गोविंद मोकाटे हा फरार झालेला आहे. पोलिसांनी इमामपूर परिसरात त्याचा शोध घेतला. परंतु, तो अजून सापडलेेला नाही. दुसरीकडे शिवसेनेने मोकाटे याला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेची उमेदवारी घोषित केलेली आहे.