'MBP Live24' चे मुख्य संपादक ऍड. उमेश अनपट यांनी उजेडात आणला होता घोटाळा
- दि. ९ एप्रिल २०१५ रोजी सर्वप्रथम छापले होते बेधडक वृत्त
- वरिष्ठांच्या दबावाला न जुमानता केला होता पाठपुरावा
- तब्बल ६ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर "सत्यमेव जयते"
याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अपर आयुक्त अशोक लोखंडे आणि कुणाल आयटीचे संचालक संतोष कोल्हे यांच्याविरुद्ध मुबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
आता या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात, या भीतीपोटी आदिवासी विकास विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांसह राज्यभर खळबळ उडाली आहे.
आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ व शबरी महामंडळासाठी सन २०१६ मध्ये ५८४ पदांची भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र खासगी संस्थेकडून ऑनलाईन राबविलेली ही भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे वादात सापडली होती.
'MBP LIVE 24'चे संपादक ऍड. उमेश अनपट यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात 9 एप्रिल 2015 रोजी "आदिवासी विभागाचा हायटेक नोकरभरती घोटाळा" या मथळ्याखाली वृत्त छापून सदर घोटाळा उजेडात आणला होता.
आदिवासी विकास महामंडळ विभागाने शासनमान्य तांत्रिक संस्था सोडून खासगी संस्थेकडून पहिल्या टप्प्यात ३८९ पदांसाठी ऑनलाइन हायटेक भरतीप्रक्रिया राबविली होती.
त्यासाठी ३६ हजार उमेदवारांनी अर्ज केले असले तरी विभागातील मांदळे, लोखंडे आणि कुणाल आयटी कंपनीचे संचालक संतोष कोल्हे यांनी संगनमत आणि आर्थिक गैरव्यवहार करत सोयीच्या उमेदवारांची भरती केली..
अशी फिर्याद महामंडळाचे कार्यकारी संचालक दीपक शिगला यांच्या आदेशान्वये महाव्यवस्थापक जालिंदर आभाळे यांनी मुंबई नाका पोलिसात दिली. त्यानुसार या प्रकरणातील तीनही संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
धमक्यांना घातली नाही भीक, झारीतले शुक्राचार्य कोण..? - हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणाशी थेट व अप्रत्यक्ष सबंध असणाऱ्या अनेकांचे पित्त खवळले होते. संबंधित वर्तमानपत्रातील एका वरिष्ठासह अनेकांनी दबाव टाकून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, 'वर' तक्रार केल्याने संबंधिताला तोंड दाबून मुक्यांचा मार बसला आणि त्यांनी नांग्या टाकल्या. तत्कालीन एका अधिकाऱ्याचे या वरिष्टाशी 'लागेबांधे' होते. या प्रकरणात अडकलेल्या दोन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तर 'थेट कायदेशीर नोटीस पाठवू' अशी धमकी देखील पत्रकार ऍड. उमेश अनपट यांना दिली होती.
मात्र, पोकळ धमक्यांनी न डगमगता त्यावेळी या अधिकाऱ्यांनी नाईलाजास्तव घेतलेल्या 'ढोंगी' पत्रकार परिषदेत जाऊन पत्रकार अनपट यांनी थेट प्रश्न विचारून खुलेआम भांडाफोड केल्यावर मात्र 'त्या' दोघांची चांगलीच भंबेरी उडाली.
पुढेही कुठल्याही दबावाला भीक न घालता पत्रकार अनपट ठाम राहिले. नंतर हळूहळू या प्रकरणातील सत्य बाहेर येत गेले. अनेक कथित प्रकरणात अडकलेल्या 'त्या' वरिष्टाचीही कार्यालयातून हकालपट्टी करण्यात आली. तसेच संबंधित अधिकारी निलंबित देखील झाले.
आता तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालाय. त्यामुळे संबंधित दोषींना वाचविण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर करणारे हे झारीतले शुक्राचार्य कोण, अशी चर्चा वृत्तपत्र आणि अधिकारी वर्तुळात सुरू आहे.
खा. चव्हाण यांचा पाठपुरावा, डवले यांचा ठपका - यानंतर तत्कालीन भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी या प्रकरणात सुमारे साडेतीनशे कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीस यांनी तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
डवले यांच्या चौकशी प्रक्रियेत देखील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा अहवाल शासनाला दिला होता. त्यानंतर मांदळे यांच्यासह दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास आदिवासी विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.
विरोधीपक्ष नेत्यांनीही उठविला होता आवाज - दरम्यान, राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणाची माहिती मागवून घेऊन सदर प्रकरणी विधिमंडळात आवाज उठविला होता. त्यामुळे मुख्यमंत्री व आदिवासी विकासमंत्री चांगलेच अडचणीत सापडले होते. पुढे या प्रकरणाला हळूहळू तोंड फुटत गेले.
भाजप सरकारच्या काळातील घोटाळा - नोकरभरती घोटाळा झाला त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर विष्णू सावरा हे आदिवासी विकासमंत्री होते. या वृत्ताचा पाठपुरावा तत्कालीन मुख्यमंत्री व आदीवासी विकासमंत्री यांच्याकडून देखील 'पाठपुरावा' सुरू होता.
विरोधीपक्ष नेत्यांनीही उठविला होता आवाज - दरम्यान, राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील या प्रकरणाची माहिती मागवून घेऊन सदर प्रकरणी विधिमंडळात आवाज उठविला होता. त्यामुळे मुख्यमंत्री व आदिवासी विकासमंत्री चांगलेच अडचणीत सापडले होते. पुढे या प्रकरणाला हळूहळू तोंड फुटत गेले.
सबधितांना अटक कधी ? रडारवर आणखी कोण ? - गुन्हे दाखल झालेल्या संबंधीत संशयितांना अटक करून पुढील कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच या भरती घोटाळ्यास जबाबदार असणारे आणखी अधिकारी व कर्मचारी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. पोलिसांच्या रडारवर आणखी कोण कोण आहेत याची चर्चा आता सुरू झाली आहे.
त्यासाठीच पोलिसांनी चोख भूमिका बजवावी, अशी मागणी संबंधित नोकर भरतीत सहभागी असणाऱ्या उमेदवारांकडून केली जात आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.