अलीकडेच व्हॉट्स अपने पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. काही महिन्यांपूर्वी व्हॉट्स अपवर ग्राहकांचा डाटा सुरक्षित राहात नसल्याच्या वावड्या उडाल्या होत्या. त्यामुळे अनेकांनी व्हॉट्स अप डिलीट करुन इतर प्रकारची मेसेजिंग सेवा देणारे अप्स डाऊनलोड केले. मुळे टेलीग्राम, सिग्नल यांसारख्या अप्सवर ग्राहकांची गर्दी झाली.
परंतु, व्हॉट्स अप वापरणे सुरक्षित असल्याचा दावा करत या कंपनीने ग्राहकांना टिकवण्यासाठी नवनव्या सेवा देण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता व्हॉट्स अपवरून पेमेंट करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिवाळी धमाका म्हणून सध्या तब्बल २५५ रुपये कॅशबॅक मिळत आहेत.
पेमेंटचा वापर करताना व्हाट्सअॅप प्रति ट्रान्झॅक्शन वर ५१ रुपयाचा कॅशबॅक मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. त्यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. तरच मोठा धमाका असलेल्या कॅशबॅक ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
असा मिळवा कॅशबॅक - व्हॉट्स अप चॅटमध्ये 'Re' आयकॉनवर क्लिक करा. पेमेंट मेथर्ड जोडा. नंतर तुम्हाला तुमच्या बँक खाते निवडावे लागेल. जे व्हॉट्स अपशी संबंधित असेल. तुमची ओळख आणि बँक डिटेल्स पडताळून पाहण्यासाठी तुमच्या फोनवर एक एसएमएस पाठवला जाईल. त्यानंतर पुन्हा व्हॉट्स अप पे सर्विसला सुरू करावे लागेल. आणि कॅशबॅक सेवेचा लाभ घेता येईल.
तरीही काळजी घ्या - ऑनलाईन व्यवहार करताना घाई न करता सर्व अटी व नियम वाचूनच पुढील प्रक्रिया करावी. 'अति घाई संकटात नेई' या म्हणीप्रमाणे अनेकदा ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी आधी व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय पुढील व्यवहार करू नयेत.