अलताफ कडकाले (अहमदनगर) - पालघर येथे होणाऱ्या वरिष्ठ राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धा राहता तालुक्यातील बाभळेश्वर याठिकाणी घेण्यात आल्या. त्यातून हा संघ निवडण्यात आला आहे.
जीन-सील तायक्वांदो असोसिएशन ऑफ अहमदनगर संघटना व राहता तायक्वांदो असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धा बाभळेश्वर येथे पार पडल्या. या स्पर्धा इंडिया तायक्वांदो व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे (ताम ) अध्यक्ष नामदेव शिरगावकार, महासचिव संदीप ओंबासे, डॉ. अविनाश बारगजे यांच्या मार्गदर्शन खाली वरील स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेतून निवडलेला संघ - मुले - ऋषिकेश तुपे, साईनाथ वाकडे, सागर सानप, संकेत खोबरे, अक्षय साळुंखे, तेजस त्रिभुवन, लक्ष्मण शिंदे, योगेश बिचितकर, मुली - पूजा सावंत, वैष्णवी जाधव, गुंजन रणदिवे, स्वप्नाली घेमुड, स्वप्नाली शिंदे, प्रतीक्षा देवरे, युक्ता गायकवाड, आसावरी वेताळ.
फुमसे खेळाडू - अविनाश हंडाळ, मुश्ताक शहा, ओम काळे, तुषार जाधव, संघप्रशिक्षक म्हणून दिनेशसिह राजपूत, सुरेश वाघ यांची निवडकरण्यात आली आहे. हा संघ आता आपले नशीब आजमावणार आहे. त्यांनी नगरचे नाव राज्यात गाजवावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
जीन सील तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंढे, सचिव संतोष बारगजे, सहसचिव अलताफ कडकाले, शकील सय्यद, घनशाम सानप, नारायण कराळे, गोरक्ष गालम, महेश मुरादे, बाबासाहेब क्षिरसागर, गणेश वंजारी, संतोष परांडे, अमोल बोधक, राजगुरू ब्रह्मचैतन्य आदींनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.