अहमदनगर - क्रीडा संघटना आणि क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो. तुम्हाला मुंबईला, पुण्याला बैठकीसाठी बोलवणार नाही. येत्या आठ दिवसात मी पुन्हा नगरला येईल. जिल्हाधिकारी, जिल्हा क्रीडाधिकारी तुम्ही फाईल काढून ठेवा, असे फर्मानच राज्याचे क्रीडा कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी काढले आहे.
नगर शहरातील विविध क्रीडा संघटना, क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांच्या विविध प्रश्नांवर बैठकीचे आयोजन सावेडीच्या कोहिनूर मंगल कार्यालयात केले होते. त्यावेळी केदार बोलत होते. येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये मुलींच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर करण्याचे काम केले जाईल.
किरण काळे यांच्या माध्यमातून नगर शहरातील क्रीडा क्षेत्राशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. तुम्ही मुंबईला यायची गरज नाही. मीच आठ दिवसात पुन्हा नगरला येऊन येथे बैठक घेवून नगर शहराचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार आहे, असे मंत्री केदार म्हणाले.