सीबीएसई व एसएससी बोर्डाने ताबडतोब शाळा सुरु कराव्यात

पिंपरी चिंचवड - करोनाच्या दुर्दैवी संकटावर अजून पूर्णपणे मात आपण केली नसली तरीही सीबीएसई व एसएससी दोन्ही बोर्डाने ताबडतोब शाळा सुरु करायला हव्यात. यामुळे पहिलीपासून पुढच्या सर्वच मुलांचे शैक्षणिक नुकसान थांबेल, असे मत लेक बचाओ आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री मनीष गाडे यांनी वक्त केली आहे.


पुणे पिंपरी महापालिकेला करोनाच्या आधी शाळेत असलेली पट संख्या व डिसेंबर २०२१ मधील पट संख्या लवकरात लवकर आपल्या संकेतस्थळावर ठळकपणे नमूद कराव्यात, अशी मागणी देखील जयश्री गाडे यांनी केली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुलींची कमी झालेली पट संख्या. 

कोरोनामुळे शाळाबाह्य झालेल्या मुलींची वेगळी नोंद करता येईल, तसेच त्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळवता येईल. करोनामध्ये अल्पवयीन मुलींची लग्ने झाली आहेत का ? हेही पालिकेने पाहायला हवे, अशी मागणी पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्त्या जयश्री मनीष गाडे यांनी केली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !