'लेक वाचवा अभियाना'च्या जयश्री गाडे यांचा रुपालीताई चाकणकर यांच्याकडून सन्मान

पुणे - पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात लेक वाचवा अभियानात जयश्री मनीष गाडे (चिखली) यांनी उल्लेखनीय कार्य करत आहेत. गेले सहा वर्षांपासून त्या या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत नुकतीच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी त्यांचा सन्मान केला.

पुणे शहरात कविताताई आल्हाट यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता. यामध्ये जयश्री गाडे यांचाही समावेश होता. यावेळी खासदार अमोल कोल्हे व  रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते विविध श्रेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. 

जयश्री गाडे या स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या भाषणातही त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या कौतुकामुळे आपले सामाजिक क्षेत्रातील कार्य करण्यासाठी बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया जयश्री गाडे यांनी व्यक्त केली.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते. राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे या पदावर नियुक्ती करणे गरजेचे होते. 

त्यामुळे महाराष्ट्र सरकारने रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली आहे. या निवडीबदद्ल सामाजिक कार्यकर्त्या जयश्री गाडे यांनीही रुपालीताई चाकणकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !