गुपित ! पेट्रोल आणि डिझेलचे दर 'या' कारणांमुळे झाले कमी

नवी दिल्ली - गेले सुमारे एक वर्षापासून इंधन दरवाढीने नागरिकांना हैराण केले होते. पेट्रोल पाठोपाठ डिझेलचे दरानेही प्रतिलीटर शंभरीचा आकडा ओलांडला होता. त्यामुळे वाहनचालक प्रचंड मेटाकूटीला आले. अशातच ऐन दिवाळीत केंद्र सरकारने इंधनावरील करात सवलत दिली आहे.

केंद्र सरकारने इंधन दरात कपात केली खरी. पण या निर्णयावरही विरोधक चांगलेच तुटून पडले आहेत. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागल्यामुळे पेट्रोलच्या दरात ५ रुपये कपात केल्याचा आरोप आता सरकारवर होत आहे. 

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, पोटनिवडणुकांमध्ये अपयश आले. त्यामुळेच भीतीने आता हा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक (Nawab Malik) यांनीही केंद्रा सरकारला टोला लगावला आहे. 

केंद्र सरकारला ५० वेळा पराभूत करा, तर पेट्रोल ५० रुपयांनी कमी होईल, असे मिश्किल 'लॉजिक' नवाब मलिक यांनी लावले आहे. तर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, भाजपचा (Bjp) ५० रुपये कपात करायची असेल, तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल. तरच इंधन दरवाढीला अंकुश बसेल. 

इंधन दरवाढीतून केंद्र सरकारने बेहिशोबी पैसेही कमावले असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे. ऐन दिवाळीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलासा देण्याच्या नावावर पेट्रोलमध्ये पाच रुपये तर डिझेलमध्ये दहा रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर ही टीकासत्र सुरू आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !