नाटय परिषद महानगर शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर.. 'हे' आहेत नवे पदाधिकारी

अहमदनगर - नाटय परिषदेच्या अहमदनगर महानगर शाखेला नाटय परिषदच्या मुंबई मध्यवर्ती शाखेने मान्यता दिली आहे. महानगर शाखेच्या अस्थायी कार्यकारी समितीने आयोजित केलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही अस्थायी कार्यकारिणी विसर्जित करण्यात आली.

तर रविवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पंचवार्षिक कार्यकारिणीची नियुक्ती करण्यात आली. आता नाटय परिषदेच्या अहमदनगर महानगर शाखेच्या नूतन अध्यक्षपदी बहुमताने रंगकर्मी क्षितिज झावरे यांची अध्यक्षपदी तर संजय लोळगे यांची प्रमुख कार्यवाहपदी एकमताने निवड करण्यात आली. 

नाटय परिषद महानगर शाखेची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे - कार्याध्यक्ष प्रसाद बेडेकर, कोषाध्यक्ष जालिंदर शिंदे, संघटक सुदर्शन कुलकर्णी, सह कार्यवाह अभय गोले, सतीश रोकडे, तुषार देशमुख. सदस्य मधुरा झावरे, सुनील काळे, देवशिष शेडगे, शिरीष जोशी, विद्या जोशी, सुजित माने व अभय राजे.

उपाध्यक्षपदी बलभीम पठारे व चैत्राली जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षितिज झावरे म्हणले, नगर शहरात सांस्कृतिक कला क्षेत्रात भरीव योगदान देऊन नाट्य चळवळ अधिक वृध्दींगत व सशक्त करण्यासाठी काम करणार आहे. स्थानिक कलाकारांसाठी नवनवीन योजना राबण्यावर भर देणार आहे. 

रंगकर्मींना प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठीही उपाययोजना राबण्यासाठी संपूर्ण नूतन कार्यकारीणी काम करणार आहे. कलावंतांच्या बैठका घेऊन शाखेची पुढील ध्येय धोरणे आखण्यात येणार आहे. शहराच्या सांस्कृतिक, कला वैभवात योगदान देणाऱ्या कलाकृती उभी करणे हीच शाखेची प्राथमिकता असेल.

शहरातील अनेक प्रथितयश ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन नव्या युवा कलाकारांना व्हावे यासाठी उपक्रम राबवणार आहे. परिषदेच्या सर्व नूतन पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !