नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने संपूर्ण जगात दहशत केली होती. कोविडचा डेल्टा व्हेरिएंट १०० दिवसांत जितक्या वेगाने पसरला, तितक्याच वेगाने एक नवा विषाणूचा अवघ्या १५ दिवसांत प्रसार होत आहे. या नव्या विषाणूची धास्ती सर्वांनी घेतली आहे. विमानतळावर सिंगापूरहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जात आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र |
भारतात सिंगापूरसह १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. हा नवा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला आहे. या कोरोनाच्या नव्या बोत्सवाना (B.1.1.529) व्हेरिएंटचे अहवाल चकित करणारे आहेत. आफ्रिकेच्या तीन प्रांतांत रोज आढळणाऱ्या रुग्णांत ९० टक्के रुग्ण या व्हेरिएंटचे आहेत.
आफ्रिकेेच्या या प्रांतात १५ दिवसांपूर्वी या विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या केवळ १ % होती. बोत्सवाना म्हणजे ओमिक्राॅनमुळे अनेक देशांत नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय तो ७ पटीने अधिक पसरत आहे. युरोपियन युनियनच्या सर्व २७ देशांनी ७ आफ्रिकन देशांच्या विमानांवर बंदी घातली आहे.
भारतात नव्या विषाणूचा सध्याा एकही रुग्ण नाही. तरीही सिंगापूर, मॉरिशससह १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जाणार आहे. कोणताही निष्काळजीपणा न करता भारत संपूर्ण खबरदारी घेणार आहे. भारतात गुरुवारी १० हजार ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.