अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला..

मुंबई - राज्यभरातील ११३ नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील.

राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनीही माहिती दिली आहे. एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या ८८, डिसेंबर २०२१मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या १८ आणि ७ नवनिर्मित, अशा एकूण ११३ नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, कर्जत, पारनेर व शिर्डी नगरपंचायतींचा देखील समावेश आहे. प्रारुप मतदार याद्यांवर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. २९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 

मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या पार्श्वभूमीवर राज्यासह नगर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !