मखदुम सोसायटीच्या वतीने मौलाना आजाद यांना अभिवादन

अहमदनगर - भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. 

शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन प्रा. महेबुब सैय्यद यांनी केले. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिना निमित्त मखदुम सोसायटी, तन्जिमे उर्दू अदबच्यावतीने भुईकोट किल्ला येथील हत्ती दरवाजा येथे अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी माजी प्राचार्य कादीर सर, संजय झिंजे, तन्जिमे उर्दू अदबचे अध्यक्ष सय्यद खलील, निसार बागवान, तन्वीर चष्मावाला, अज्जु भाई शेख, आसिफ सर, ठाकुरदास परदेशी, अमोल बास्कर, योगेश गायकवाड आदि उपस्थित होते. सय्यद म्हणाले, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. 

अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते. देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. 

म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट दोन कोटीचे होते. ते 1958 साली 30 कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचलली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या. यावेळी प्रास्ताविक करतांना सय्यद खलील म्हणाले, 1923 साली अवघ्या 35 व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. 

सन 1940-45 या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात 1942 चे ‘अंग्रेजो भारत छोडो’ ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण नऊ वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे.

याप्रसंगी संजय झिंजे म्हणाले, स्वातंत्र्य सेनानी मौलाना आझाद यांचे भारताच्या जडण-घडणीत असलेले योगदान पाहता त्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला होण्यासाठी शैक्षणिक संस्थ, शाळा, कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. प्रास्तविक तन्वीर चष्मावाला यांनी तर सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. आभार ठाकुरदास परदेशी यांनी मानले.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !