प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

अहमदनगर - प्रेस फोटोग्राफर महेश कांबळे याना आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून ऍक्टिव्ह मराठी परिवाराच्या वतीने माळीवाडा येथे  आदर्श पत्रकार पुरस्कार  देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी  महापौर रोहिणी शेंडगे, मनीष साठे, पोपटराव साठे, मधुकर रावजी पठारे, साहेबराव पाचरणे, विजय वडागळे, ना. म. साठे, नामदेव चांदणे, जालिंदर उल्हारे, ऍक्टिव्ह मराठीचे संचालक उमेश साठे व जालिंदर उल्हारे  आदीं मान्यवर मोठ्या संख्नेने उपस्थित होते.

महेश कांबळे हे गेली २५ वर्षे पत्रकारिता करत असून त्याना दा. प. आपटे पत्रकारिता पुरस्कार, पुणे महानगरपालिका, दै सामना, दै. लोकसत्ता, संकेत अकॅडमी, पुणे, यांचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच ते मनपाचे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य आहेत.

जागतिक साळी फाऊंडेशन व बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आहेत. प्रतिबिब संस्थेचे सचिव असून लक्ष्मीनारायण शाळेचे माजी सचिव आहेत. त्यांनी काढलेले प्रेस फोटो व लेख मराठी, हिंदी, इंग्रजी दैनिकात प्रकाशित झाले आहेत. 

अहमदनगर प्रेस फोटोग्राफर्स संघटना दरवर्षी फोटो प्रदर्शनमध्ये त्याचे फोटो सहभागी असतात. त्यांनी आचार्य आनंदऋषी महानिर्वाणचे तसेच फोटो प्रदर्शन व फोटो  क्लबच्या वतीने नगरमध्ये फोटो प्रदर्शन भरवलेले होते. हा  पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !