अहमदनगर - महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा श्रीगोंदा कॉलेज सीनियर विभागातील बॉक्सिंग खेळाडू विकास रोहिदास घाडगे याने पारनेर येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालय (जिल्हास्तरीय) बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक मिळवून आंतर विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
विकास घाडगेच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष आमदार बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माननीय बाबासाहेब भोस, महाविद्यालय विकास समिती सदस्य राहुल जगताप, यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
महावीर पटवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सीनियर विभाग उपप्राचार्य प्रा. मधुकर खोमणे, यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. तर डॉ. एल आर पाटील जुनियर उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विकास घाडगे याला जिमखाना प्रमुख देशमुख, क्रीडा संचालिका खाडे वैशाली, क्रीडा शिक्षक संजय डफळ यांनी मार्गदर्शन केले. आगामी स्पर्धेत नगरचे नाव नक्कीच उंचावणार असल्याचा विश्वास विकासने व्यक्त केला आहे.