पुणे - धडाकेबाज पोलिस अधिकारी तथा पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश त्यांच्या 'फिटनेस'मुळेही सर्वपरिचित आहेत. कृष्ण प्रकाश हे गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून जसे ओळखले जातात, तसेच ते स्वत:च्या शरीरयष्टीकडेही अधिक लक्ष देण्यासाठी ओळखले जातात.
माणसाचं वय जसजसं वाढत जातं, तसतसा तो वार्धक्याकडे झुकत जात असतो. याचा परिणाम त्याच्या उत्साहावर देखील होत असतो. मात्र, काही माणसं जसजशी वयाने मोठी होत जातात, तसा त्यांचा उत्साह आणि जज्बाही वाढतच जात असतो. कृष्ण प्रकाश हे यासाठीच ओळखले जातात. म्हणून आजही त्यांचे असंख्य चाहते आहेत.
कृष्ण प्रकाश हे कोणाचे चाहते आहेत? असा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो. याचे उत्तरही त्यांनी अनेकदा दिलेले आहे. देशाचा नागरिक म्हणून जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडत असतो, त्याला मी नमन करतो, असे त्यांनी अनेकदा बोलून दाखवलेले आहे.
आपले आयुष्य देशासाठी वेचणारे सामाजिक कार्यकर्ते, देशाचे उज्वल भविष्य असलेली युवा पिढी आणि बालके यांच्यामध्येच भारताची अखंडता टिकवून ठेवण्याची क्षमता आहे, असे ते म्हणतात. कृष्णप्रकाश त्यांच्या कार्यकर्तृत्वात कितीही मग्न असले तरी स्वत:च्या फिटनेसकडे ते कटाक्षाने लक्ष देतात.
असे मजबूत बाहूचे पोलिस अधिकारी स्वत: सिने अभिनेता सुनील शेट्टी याचे चाहते आहेत. सिनेसृष्टीत अनेक कलाकार फिटनेसला महत्व देत असतात. त्यांपैकी काही जणच अंतकरणापासून शरीराकडे संपत्ती म्हणून पाहतात आणि तिची काळजी घेतात. सुनील शेट्टी यापैकीच एक.
कृष्ण प्रकाश यांनी अलीकडेच आपल्या फेसबुक प्रोफाईलवर सुनील शेट्टी याच्यासोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये ते आणि सुनील शेट्टी सोबतच पायऱ्या चढत असल्याचे दिसत आहे. यात सुनील शेट्टीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आहे. यावरून त्यांची मैत्री असल्याचे स्पष्ट होते.
"आपला पुणे सायक्लोथॉन'ला एक मोठे यश मिळाले आणि ते खरोखरच विविध लोकांच्या निःसंदिग्ध, अखंड पाठिंब्यामुळे मिळाले आहे. माझा जिवलग मित्र सुनील शेट्टी हा त्यापैकीच एक होता. माझ्या सारखाच तोसुद्धा नेहमी फिटनेस आणि वेलनेसच्या कारणाला पाठिंबा देतो." असे कृ़ष्णप्रकाश यांनी म्हटले आहे.