रेसिपी - दिवाळीच्या सणाला जीभेच्या चवेचे चोचले पूर्ण करणारी करंजी सर्वांनाच आवडते. पण यातही न तळता तयार केलेली करंजी देखील तयार करता येते, हे वाचून तुम्हाला नवल वाटले असेल ना.? आज या न तळता तयार होणाऱ्या खव्याच्या करंज्या कशा तयार करायच्या हे तुम्हाला सांगणार आहोत.. (Recipe)
या करंज्या तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ -
५०० ग्रॅम खवा
१ वाटी पिठी साखर
५ - ६ वेलदोड्यांची पूड
२ चमचा चारोळी
१ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
अशी बनवा न तळता खव्याची करंजी..
खवा हाताने सारखा करावा व थोड्या तुपावर भाजून घ्या.
२ चमचा पिठीसाखर बाजूला करून उरलेली साखर खव्यात मिसळावी.
त्यातच वेलची पूड घालावी.
चारोळी तव्यावर सुकीच भाजून घ्या.
खोबरे किस भाजून घ्यावा.
निवल्यावर हाताने चुरून घ्यावा.
चारोळी, खोबरे व शिल्लक पिठीसाखर एकत्र करून सारण तयार करावे.
खव्याचा लिंबाएवढा गोळा प्लॅस्टिकवर पुरीप्रमाणे थापावा.
त्यावर थोडे सारण घालून करंजी बंद करावी.
कडेने मुरड घालावी.
करंजीचा साचा असल्यास त्यात घालून करावी.
खव्याच्या करंज्या तळायच्या नाहीत.