मुंबई - एकदा सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला उर्वरित आयुष्य आपल्या कुटुंबासाठी, मित्रपरिवारासाठी आणि वैयक्तिक जगण्यासाठी असावे, अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. परंतु, आपल्या कर्तव्याप्रति अपार निष्ठा असलेल्या काही अधिकारी, नोकरदार असतात, ज्यांना सेवानिवृ्तीनंतरही देशासाठी, समाजासाठी काही ना काही सेवा करावी वाटते.
अनेक अधिकारी व नोकरदार सेवानि़वृत्तीनंतरही आपले कर्तव्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे पार पाडत राहतात. अशा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी राज्य शासनाने पुन्हा करिअरची, नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयात नोकरीची संधी निर्माण करण्यात आली आहे.
वाचा यासंदर्भातील अधिसूचना..