मुंबई - टी ट्वेंटी (T Twenty) विश्वचषक (Worldcup)) सामन्यात भारतीय संघाने सुमार कामगिरी केल्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत. क्रिकेट चाहत्यांनी सोशल मिडियासह मिळेल त्या माध्यमातून भारतीय संघाविषयी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट (Cricket) संघाला नवे प्रशिक्षक (Coach) मिळणार आहेत. बीसीसीआय (BCCI) ने तशी घोषणा केली आहे.
बीसीसीआयच्या वतीने बुधवारी ही घोषणा करण्यात आली. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर शास्त्री यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. रवी शास्त्री २०१७ पासून टीम इंडियाचे प्रशिक्षक आहेत. त्यांचा करार २०१९ मध्ये वाढवण्यात आला होता. आता म्हणूनच नवे प्रशिक्षक दिले जात आहेत.
भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. द्रविड टी-ट्वेंंटी विश्वचषक स्पर्धेनंतर तो संघात सामील होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची मायदेशातील मालिका ही त्यांची प्रशिक्षक म्हणून पहिली नियुक्ती असणार आहे. राहुल द्रविड यांनी यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) अध्यक्षपद भूषवलेले आहे.
नियुक्तीनंतर राहुल द्रविड म्हणाले की, “भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तसेच आपण मी या भूमिकेसाठी उत्सुक आहे. टीम इंडियाने शास्त्री यांच्यासोबत खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आता मला ही कामगिरी पुढे न्यायची आहे.