ती 'आत्महत्या' नाही, तर तिचा 'घातपात' झाल्याचा दावा

अहमदनगरश्रीरामपूर येथे एका विवाहितेची आत्महत्या झाली आहे. मात्र तिने आत्महत्या केलेली नसून तिचा घातपात असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केला आहे. पोलीस अधिक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षकांना तसे निवेदन दिले आहे. 


याप्रकरणी चौकशी करुन पीडितास न्याय मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे. जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात दिले. तसेच नाशिक जिल्हाध्यक्षा भावना हागवणे यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना दिले.

श्रीरामपूर येथे २2 ऑक्टोंबर रोजी माधुरी उमेश बोराडे या नवविवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र ही आत्महत्या नसून, विवाहित महिलेचा घातपात करण्यात आल्याचा दावा अन्याय निवारण समितीने केला आहे. 

माधुरी ही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची गोल्ड मेडल मिळवलेली अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. तसेच तिने एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी देखील सुरु केली होती. मात्र तिचा घातपात करण्यात आला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

श्रीरामपूर येथील नवविवाहितेला न्याय मिळण्यासाठी या प्रकरणी चौकशी करुन आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केली आहे. अन्यथा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याच इशारा दिला आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !