'विळखा' कादंबरीला साहित्य परिषदेचा 'ग. ल. ठोकळ' उत्कृष्ट पुरस्कार

अहमदनगर - दशरथ चौरे लिखित 'विळखा' या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ल. ठोकळ उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने या साहित्य पुरस्कारांचे वितरण एस. एम. जोशी सोशलिस्ट फौंडेशनच्या सभागृहात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते झाले.

'विळखा' ही कादंबरी प्रदूषण, राजकारण व शेतकरी जीवनावर आधारित आहे. या कादंबरीला याआधीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मराठी वाड्‌मय परिषद, बडोदा यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य कादंबरी पुरस्कार, साप्ताहिक शब्दशिल्प पुरस्कार मिळालेले आहेत.

अकोले यांचा साहित्य रत्न पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परिषदेचा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर यांचा राज्यस्तरीय अशोकसिंग ठाकूर पुरस्कृत कादंबरी पुरस्कार, साहित्य विहार संस्था, नागपूर यांचा राज्यस्तरीय मराठी कादंबरी पुरस्कार प्राप्त आहे.

विळखा कादंब संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली आहे. दशरथ चौरे हे स्थापत्य अभियंता असून त्यांच्या ''गावकुसातील माणसं' या कथा संग्रहास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बाबूराव बागूल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांचे अभिनंदन होत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !