मला हेवा वाटतो कधीकधी... 'या' शहराचा.

वर्दळ असलेला परंतु मजबूत, गुणवत्ता असलेला डांबरी रस्ता. अन् बाजुला असलेला पादचारी मार्ग. जागोजागी अतिशय कल्पकतेने निर्माण केलेले बसण्यासाठी असलेले कट्टे. महापालिका, संबंधित अधिकारी, नगरसेवक या साऱ्यांच्या रसिकतेला सलाम.! फर्ग्युसन रोड अर्थात एफ सी रोड.. 


इथे येणारी माणसे किती सुखावून जात असतील हे पाहून.. इथे क्षणभर विसावून.. येथे बसण्यासाठी असलेले कट्टे ही अगदी ग्रॅनाईटने तयार केलेले.. सार्वजनिक कार्यात काम करणाऱ्यांना डोळे असतील तर हे सहज घडत असतं.. कलात्मक दृष्टी, शहरावर प्रेम,अन् कर्तव्यांची जाणिव असली की तुमचं शहर निदान काही प्रमाणात सुंदर करण्याची किमया साध्य होतेच..

पुणे. 
माझ्या शहराच्या शेजारीच असलेलं शहर. 
मला हेवा वाटतो कधीकधी... 
इथल्या लोकांचा आणि चांगल्या रस्त्यांचा.

- जयंत येलुलकर (अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !