राज्यात ७ हजार १३० रिक्त ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा मुहूर्त ठरला.. 'या' दिवशी होणार मतदान

मुंबई - राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे ७ हजार १३० सदस्यांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

मदान यांनी सांगितले की, निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी ७ डिसेंबर २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. 

त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. मात्र गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३.०० पर्यंतच असेल. या सर्व ठिकणी २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !