मुंबई - शनिवारी सकाळी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात लाग लागून ११ जणांचा दुर्दैवी मृ़त्यू झाला. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे देखील हळहळले आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याची प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केली आहे.
दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे निर्देश पवार यांनी दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले.
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात 'आयसीयु' विभागाला भीषण आग, १० जण दगावले
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Murshrif) आणि जिल्हाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्णालयातील अन्य रुग्णांच्या सुरक्षिततेची व आरोग्यसेवेची संपूर्ण काळजी घेतली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच रुग्णालयांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
अहमदनगरचे अग्नीतांडव ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' आदेश