मुंबई - गेले काही महिने सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणलेल्या इंधनाचे दर काही प्रमाणात कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. परंतु, पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कराबाबत महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे.
शरद पवार यांना याबाबत विचारणा केली असता पवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इंधन दरात कपात होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. केंद्र सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यानंतर देशातील २२ राज्यांमध्ये व केंद्रशाषित प्रदेशांमध्ये पेट्रोल व डिझेलचे दर तत्काळ कमी करण्यात आले आहेत.
मात्र, महाराष्ट्रात अद्यापही इंधनाचे दर तितके कमी झालेले नाहीत. त्यामुळे सरकार इंधनाच्या दरात कपात कधी करणार, याची आता उत्सुकता आहे. शरद पवार यांनीही इंधनाच्या दरात कपात करण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शवला आहे. पण, दरकपात करण्यात मुहूर्त कधी मिळेल, हे अजून स्पष्ट झालेले नाही.
राज्यात पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केला जाणार की नाही, याबाबत आम्हाला राज्य सरकारशी चर्चा करावी लागेल आणि सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेऊन दिलासा देईल, याची मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्ती केली आहे.