तेच बर होतं...
संध्याकाळी खेळून आल्यावर..
भूक लागायची..
तेव्हा आई जेवण वाढायची..
फोडणीची खमंग डाळ अन् गरम भात....
हेच आवडीचं ताट असायचं..
शाळा सुटल्यावर मित्रांसोबत घरी येताना,
रस्ता मालकीचा वाटायचा..
डोंबाऱ्याचा खेळ पहाता पहाता,
टिव्ही शो रुमच्या काचेतली
भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच पहात घरी यायचो...
रविवारी कॉलनीतल्या मित्रांसोबतची
आतुकली भातुकलीची मजाही काही औंर होती..
संक्रांतीला कॉलनीत
सगळ्या घरी तिळगुळ घेण्याचा गोडवा होता..
गोळा झालेले खिसाभर तिळगुळ मन तृप्त करायचं..
हे आता विरून गेलं..
बालपणी खाऊच्या चिवड्यातला
काजू शोधायची गंमतही वेगळी होती.
आता ताटात कधी बदामाचा शिरा असतो...
पणं तो काजू सापडल्याचा आनंद काही मिळत नाही...
लवंगी फटाके एकेक वाजवताना दिवाळीचा उत्साह वाढवायची..
आज बॉम्बची लड लावली,
तरी सण झाल्यासारखं वाटत नाही...
जुनं ते सोनं होतं..
असंच आता म्हणायचं..
वेदनांच्या बाजारात अश्रूंना मिठीत घ्यायचं...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)