अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात 'आयसीयु' विभागाला भीषण आग, ११ जण दगावले.. (वाचा रुग्णांची नावे)

अहमदनगर - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या विभागात उपचार घेत असलेले ११ रुग्ण दगावले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर इतर काही रुग्ण भाजून जखमी झाले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात जवळपास २० रुग्णांवर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी या विभागात आग पसरल्याने एकच धावपळ उडाली. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रनेचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नगर महापालिका व एमआयडीसी अग्निशमन विभागाची वाहने तात्काळ दाखल झाली. या वाहनांनी यावेळी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच रुग्णालयाचे व्यवस्थापन अतिदक्षता विभागात पोचले. आतले चित्र भयंकर होते.

संपूर्ण अतिदक्षता विभाग आगीत भस्मसात झाला होता. प्राथमिक माहितीनुसार या आगीत ११ रुग्ण दगावले असल्याची, तसेच ७-८ रुग्ण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. इतर जखमी रुग्णांना तत्काळ उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले आहे. पोलिस आणि रुग्णालय प्रशासन घटनेची अधिक माहिती घेत आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !