पुणे - येथील रेलफोर फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “सेवादिप पुरस्कार २०२१” अनाथ, गरजु आर्थीक दृष्टीने दुर्बल असणाऱ्या युवकांच्या सक्षमी करणासाठी कार्य करणाऱ्या नगरच्या 'युवान' संस्थेला प्रदान करण्यात आला.
युवा नेतृत्व व युवानचे संस्थापक संदिप कुसळकर यांना '५ लाख रूपये व सन्मानपत्र' या स्वरूपात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी युवानचे सचिव सुरेश मैड, संचालिका वर्षा कुसळकर व अविनाश बनकर ऊपस्थित होते.
सामाजिक कार्यातील २५० संस्थाच्या सर्वेक्षणातुन निवड करून १० एनजीओ आणि २ सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजसेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी मान्यता देऊन दिवाळी साजरी केली. प्रत्येक स्वयंसेवी संस्थेला ५ लाख रुपये आणि ३ सामाजिक कार्यकर्त्यांना २.५ लाख, उत्कृष्टतेच्या प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातून आणि ग्रामीण आणि आदिवासी विकास, शिक्षण आणि युवा सक्षमीकरण, विशेष-अपंग आणि वृद्ध व्यक्तींची आरोग्यसेवा, बालसंगोपन आणि शिक्षण आणि प्रामुख्याने शैक्षणिक संशोधनासाठी अथक सेवा करणाऱ्या व्यक्ती अशा विविध श्रेणींमधून सेवादीप पुरस्कार प्राप्तकर्त्यांची निवड करण्यात आली.
ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील मुलांसाठी काम करणार्यांना सामाजिक कार्यकर्त्याना त्यांच्या निस्वार्थ सेवे करिता पुरस्कार देण्यात आला.
सेवादीप पुरस्कार मिळालेल्या संस्थांमध्ये युवान ग्राम मंगल, दीपस्तंभ फाऊंडेशन, इन्फंट इंडिया, जीवन संवर्धन फाऊंडेशन, केअरिंग हँड्स फाऊंडेशन, आरंभ ऑटिझम फाउंडेशन, आपला परिवार वृद्धाश्रम, जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, माई बालभवन व सामाजिक कार्यकर्ते अजय किंगरे आणि अनिल चाचर, यांचा समावेश आहे.
या पुरस्कारामुळे त्यांना त्यांचे उदात्त कार्य चालू ठेवण्यास मदत होणार आहे. sevadeep.org हे देणगीदारांना स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यासाठी एक ऑनलाइन देणगी प्लॅटफॉर्म आहे, जिथे देणगीदार त्यांचे जुने/ नवे फर्निचर, उपकरणे, कपडे इत्यादी त्यांच्या पसंतीच्या व गरजू संस्थेना दान करता येतात. .
रेल्फर फाऊंडेशन अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र देखील चालवत आहे. गेल्या १८ महिन्यांपासून कोविड लॉकडाऊनच्या काळात सेवादीप स्वयंसेवक ससून हॉस्पिटल आणि विविध कामगार शिबिरांच्या बाहेर मोफत जेवणाचे डबे वाटप करत आहेत.
"सेवादीप प्लॅटफॉर्म सामाजिक संस्थेच्या गरजा आणि पूर्तता यातील अंतर कमी करत एक सामाजिक चळवळ उभा करण्यात आली आहे, यामध्ये सर्व संस्था व दात्यांनी सहभागी व्हावे” असे रेल्फोर फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक नाथानी यांनी यावेळी सांगितले.