MBP Live24 - टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना रविवारी खेळला जाणार आहे. हा सामना पाकिस्तान संघासोबत होणार आहे. त्यामुळे या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यानिमित्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकार परिषद घेतली. पण, अचानक तो भडकला.
विराट कोहली म्हणाला, विजयासाठी भारतीय संघ तयार आहे. ही पत्रकार परिषद सुरु असताना काही पत्रकारांनी कोहलीला, टी-ट्वेंटी स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडणार का? असे विचारले. त्यावेळी मात्र कोहलीचा संताप अनावर झाला. 'मी या आधीही स्पष्टपणे यावर माझे मत सांगितले आहे, आणि तरीही जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा हेच विचारायचे असेल तर मी काहीही बोलणार नाही, असे तो म्हणाला.
सध्या आमचे सर्व लक्ष या विश्वचषक स्पर्धेकडे लागलेले आहे. आम्ही एक संघ म्हणून आमचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करू, आणि तुम्हाला जर याच्या पलीकडे काही माहिती पाहिजे असेल तर ती येथे मिळणार नाही.' असे कोहली यावेळी म्हणाला. तरीही पत्रकार त्यांच्या प्रश्नाचा पुनरुच्चार करत होते. यावेळी विराट कोहली याच्या चेहऱ्यावर संताप दिसून येत होता.