स्पोर्ट - टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एका पाकिस्तानी पत्रकारावर चिडला. पत्रकाराने ईशान किशन आणि रोहित शर्माला प्रश्न विचारत होता. त्यावेळी कोहली संतापला.
विश्वचषक सामने खेळण्यापूर्वी सराव सामन्यांमध्ये आणि आयपीएलच्या शेवटच्या सामन्यांमध्ये इशानच्या बॅटमधून खूप धावा झाल्या होत्या. त्यामुळे ईशान किशन पुढील सामन्यात रोहित शर्माची जागा घेईल का? असा प्रश्न पाकिस्तानी पत्रकाराने विचारला. त्यावर कोहली चांगलाच संतापला.
मी रोहित शर्माला टी -20 संघातून वगळावे असे तुम्हाला वाटते की काय, असे चिडून कोहलीने त्याला विचारले. तुम्हाला काही वाद हवा असेल तर तुम्ही मला कळवू शकता. मी त्यानुसार उत्तर देईन, असे म्हणत कोहलीने स्वत:चे डोके धरून हसायला लागला. आमचा संघ प्रत्येक संघाचा आदर करतो, असेही तो म्हणाला.
आज पाकिस्तानने आपल्यापेक्षा सरस खेळ केला आहे यात शंका नाही. कोणताही संघ दहा गडी राखून जिंकत नाही. त्यामुळे त्यांना श्रेय देणे गरजेचेच आहे, असे म्हणत पाकिस्तानच्या खिलाडू वृत्तीचेही कोहलीने पत्रकार परिषदेत कौतुक केले. तसेच पुढील सामन्यांमध्ये भारतीय संघ निश्चित चांगली कामगिरी करेल, अशी ग्वाही त्याने दिली.