MBP Live24 - येत्या दि. १ डिसेंबरपासून टीव्ही पाहणे अधिक महाग होणार आहे. स्टार, वायाकॉम, झी आणि सोनीचे अनेक प्रीमियम चॅनेल आता बुकेत उपलब्ध होणार नाहीत. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
हा बुकेमध्ये समाविष्ट केलेल्या वाहिन्यांच्या किंमती निश्चित करण्याचा परिणाम आहे.
त्यामुळेच येत्या १ डिसेंबरपासून टीव्ही चॅनल्सची बिले वाढणार आहेत.
देशात आघाडीवर असलेले ब्रॉडकास्टिंग नेटवर्क वायाकॉम, झी, स्टार आणि सोनीने काही चॅनल्स त्यांच्या बुकेतून बाहेर काढत त्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढत आहेत.
हा आदेश कायम ठेवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, पण त्यावर त्वरित स्थगिती आली नाही. तर ३० नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
आपले नुकसान कमी करण्यासाठी, नेटवर्कने काही लोकप्रिय वाहिन्या बुकेतून काढून त्यांच्या किमती वाढवण्याचा विचार केला आहे. यामध्ये क्रीडा, प्रादेशिक व सामान्य मनोरंजन श्रेणीतील अनेक वाहिन्यांचा समावेश आहे.
ज्यांना या वाहिन्या पाहण्याची सवय आहे, ते जास्त दर देऊन सदस्यता घेतील, अशी अपेक्षा ब्रॉडकास्ट नेटवर्क्सला आहे. तोपर्यंत टीव्ही पाहणे महागणार आहे.