अरे आताच तर ओळख झाली !
हाय, हॅलो झाले..
तिला कळू तर दे 'तू'.
तुझ्याबद्दल विश्वास तर वाटू दे..
आधी 'मित्र' तर हो तिचा.!
मग करेल ना तुझ्याशी मोकळेपणाने गप्पा.
पण छे.. 🤦♀️
पहिल्या दिवशी तिने 'इनबॉक्स'ला उत्तर दिले ना..
मग ती बांधील आहे उत्तर देण्यासाठी.
हे ठरवणारा तु कोण ?
'मैत्री' म्हणा की 'प्रेम'..
हळुवार फुलवत न्यावे लागते..
इतकं सोपं कळत कसं नाही ?
तिलाही काम असतात घरात.
तुमची बायको पण करते ना घरात कामं..
तीही कुणाची तरी बायको आहेच की.
मुलं असतात घरात.
प्रत्येक वेळी आई फोन घेऊन बसली..
तर काय संस्कार होतील त्यांच्यावर ?
समजून घे.
होईल तुझी मैत्रीण.
रोज उठून तेच तेच जर मेसेज केले,
तर ना तर मैत्री, ना काही...
सो....
सुधरा रे जरा 😀😀
- दीपाली माळी (अहमदनगर)