क्रीडा - भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीत भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागलेआहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानच्या संघाने भारताचा इतक्या वाईट पद्धतीने पराभव केला आहे. पाकिस्तानने १५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलागही सहज केला.
पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांनी दणदणीत बॅटिंग करत सामना एकतर्फी जिंकला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी भारतीय संघाच्या गोलंदाजांना संधीच दिली नाही. सुरुवातीपासूनच या दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व गाजवले.
बाबर आझमने ५२ चेंडूत नाबाद ६८ आणि मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. पाकिस्तानच्या संघाने १३ चेंडू आधीच सामना जिंकून भारताला पराभवाची धूळ चारली. सुरुवातीला फलंदाजी करताना भारताने पाकसमोर अवघे १५२ धावांचे लक्ष्य ठेवले होते.