आंदोलन पेटले | शेवगाव आगारात एसटीचालक दिलीप हरिभाऊ काकडे यांनी उचलले टोकाचे पाऊल


बसच्या शिडीला गळफास घेऊन आत्महत्या


अहमदनगर - राज्य परिवहन महामंडळाच्या (ST) कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण, महागाई भत्ता वाढ, आणि घरभाडे भत्ता वाढ आदी मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. पण शुक्रवारी सकाळी शेवगाव (Shevgaon) आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (Dilip Haribhau Kakde) या एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.



शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी होती. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे आगार सचिव दिलीप लबडे (Dilip Labade) या घटनेबद्दल म्हणाले, काकडे हे नेहमी एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण झाले पाहिजे, यासाठी आग्रही होते. शेवगाव इथे २६ ऑक्टोबरला झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. 


एसटी चालक दिलीप काकडे यांची 'ती इच्छा अखेर अपूर्णच राहिली..


ही मागणी मान्य झाल्याशिवाय संप (Srike) मागे घेऊ नये, असे त्यांचे मत होते. मात्र शासनाने विलीनीकरण न करता महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढ या मुद्यावर संप मिटवला. त्यानंतर काकडे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे ही मागणी आग्रही आणि संवेदनशील झालेली आहे.



राज्यात आर्थिक विवंचनेतुन २८ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. काकडे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. सर्वजण शिक्षित असून मुले नोकरीला आहेत. मात्र ज्या एसटी महामंडळात आयुष्यभर काम केले त्या एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे आणि एक शासकीय कर्मचारी म्हणून निवृत्त व्हावे अशी दिलीप काकडे यांची इच्छा होती.


दरम्यान, कोल्हापूर (Kolhapur) आगारातील निम्या बस अजूनही जागेवर उभ्या असून पन्नास टक्के कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलेले आहे. असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काकडे यांच्या निधनामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मात्र शोककळा पसरली आहे. 

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !