ती होती,
गर्दीतून, वळणातून,
अडचणींतून पोहोचायची..
टपोऱ्या डोळ्यांची..
हसऱ्या गालांची...
तिला प्रेम समजायचं,
जीव लावायची..
विश्वासानं मिठीत यायची..
घामेजलेल्या छातीवर टेकलेले तिचे ओठ..
थरथरलेल्या शब्दांनी व्यक्त होताना...
बंद डोळ्यांत स्वप्न दिसायची तिला...
मंजुळ नादाचे तिच्या पायातील पैजण...
रहस्य तिच्या माझ्या आयुष्याचे...
कधीही जगासमोर न येणारे...
दडवून ठेवलेत सारे क्षण...
सापडणार नाहीत कधीही...
वादळ येईल..
वारा वाहिल..
पाऊस पडताना,
थंडी पडेल...
बर्फ साचेल त्या जगण्यावर..
कधीतरी मी नसेल...
ती ही निघुन जाईल या संसारातून...
लपवलेल्या त्या आठवणी..
अजूनही खोल ढिगारात...
पावसाच्या थेंबातून फुटणारे अंकुर..
आता कुणासाठी.?
- जयंत येलुलकर (रसिक ग्रुप, अहमदनगर)