'सावित्री-फातेमा विचार मंच प्रश्नमंजुषा' स्पर्धा प्रवेशाला 'इतके' दिवस मुदतवाढ

विजेत्यांना मिळणार तब्बल २ लाख २५ हजारांची बक्षीसे

अहमदनगर - पैग़ंबर जयंतीच्या निमित्ताने ‘सावित्री फातेमा विचारमंच अहमदनगर’ तर्फे साने गुरुजी लिखित ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकावर आधारित ऑनलाइन स्पर्धा परिक्षेचे (Online Contest) आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विशेषतः अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासाठी आयोजित केली आहे.

साने गुरुजी (Sane Guruji) लिखित ‘इस्लामी संस्कृति’ (Islam Culture) या पैगंबर चरित्रावरील पुस्तकाच्या प्रस्ताविकात आदरणीय विनोबाज़ी भावे (Vinoba Bhave) लिहितात, हिंदू (Hindu) आणि मुसलमान हज़ारों वर्षांपासून भारतात (Bharat) (India)एकत्र राहत आहेत. तथापि एकमेकांच्या थोर पुरुषांविषयी आणि धर्मग्रंथांविषयी एकमेकांना पुरेशी काय, फ़ारशी माहिती (Knowledge) नसते. ती असणे जरूरी आहे. 

कारण आम्हाला एकत्र नांदायचे आहे आणि एकत्र नांदून, विविधतेत एकता कशी राखता येते, इतकेच नव्हे, विविधतेनेच एकता (Unity in Divercity) कशी खुलते, हे जगाला दाखवायचे आहे. या दृष्टिने प्रस्तुत पुस्तक (Book) विशेष स्वागतार्ह आहे.  इयत्ता पहिली ते बारावी, पदवीधर, पदव्युत्तर आणि पी.एच.डी, तसेच खुला गट, अशा तीन गटांमध्ये स्पर्धा असणार आहे.

प्रत्येक गटांमध्ये अनुक्रमे पहिले बक्षिस रु. ३१ हजार रुपये, दूसरे बक्षीस २१ हजार रुपये, तिसरे बक्षीस ११ हजार रुपये दिली जातील. प्रत्येक गटात प्रत्येकी रु. अकराशे रुपयांची अकरा बक्षिसे उत्तेजनार्थ दिली जातील. स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल. नावनोंदणी शुल्क प्रत्येकी ५० रुपये असेल.

नावनोंदणी ऑनलाइन (Online Registration) केली जाईल. नाव नोंदणीची अंतीम तारीख (Last Date) २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका (Question Paper) ऑनलाइन पाठवली जाईल. नावनोंदणी झाल्यानंतर प्रत्येकाला साने गुरूजींचे लिखित ‘इस्लामी संस्कृती’ हे पुस्तक (Book) मोफत दिले जाईल. 

१८ डिेसेंबर २०२१ रोजी १०० मार्काची परीक्षा घेतली जाईल. या परिक्षेनंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रमांत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन समाजात सदभावना वृद्धिंगत करण्याचा कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

नावनोंदणी करण्यासाठी - https://rzp.io/l/QFNA1KVJh या लिंकचा वापर करावा] असे आवाहन सर्जेराव निमसे, अॅनड. संभाज़ी बोरुडे, ह.भ.प. अजय महाराज बारस्कर, कॉ. बहिरनाथ वाकळे, डॉ. सय्यद रफिक, हाजी शौकतभाई तांबोली, मौलाना इर्शाद मखदूमी यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक -

  • आमिर सय्यद - 9226701819 
  • उमेर शेख - 9260505000 
  • मुनज़्ज़र शेख - 9422212332

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !