औरंगाबाद - प्रा. राजन शिंदे यांची हत्या कोणी केली, याचा धागादोरा पोलिसांना गवसला आहे. त्या आरोपीचे नाव आणि ओळखही त्यांना पटली आहे. याबाबतची सविस्तर माहिती पोलीस कोणत्याही क्षणी जाहीर करणार आहेत.
आता मात्र पोलिसांच्या संशयाची सुई बरोबर दिशेने वळल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांना रविवार दुपारपर्यंत फक्त या गुन्ह्यातील सबळ पुरावे, मिळतील, अशी अपेक्षा आहे.
मारेकऱ्याने शिंदेंच्या डोक्यात एका जड वस्तूने सलग पाच वार केले. त्यात त्यांचा प्राण गेला. तरीही धारदार नव्हे तर बोथट हत्याराने गळा, हाताच्या नसा कापल्या. हत्यारे घराजवळच्या विहिरीतच फेकली, असा अंदाज आहे.
शनिवारी रात्री उशिरापर्यंत विहिरीतून पाण्याचा उपसा सुरू होता. रविवारी ठोस कारवाई होऊ शकते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी स्थापन केलेली एसआयटीने शनिवारी गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
प्रा. शिंदे यांच्या मारेकऱ्याने कबुली जबाबही दिला आहे. गुन्हा उघडकीस आणण्यात काही अडचणी होत्या. पण आता आम्ही आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळणार आहोत, असे गुन्हे शाखेचे अधिकारी आघाव म्हणाले.
हेही वाचा - प्रा. राजन शिंदे यांना त्या व्यक्तीने 'का' ठार मारले?