अहमदनगर - महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची पापे भरली आहे. आपली पापे झाकण्यासाठी ईडी, सीबीआय यांच्यावर दोषारोप केले जातात. जिल्ह्यातला एका बड्या मंत्र्याचा गैरव्यवहार उजेडात आणणार आहे, असा इशारा माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला आहे.
या मंत्र्यांने किती महसूल गोळा केला, हेही देखील समोर येणार आहे, असे विखे म्हणाले. श्रीरामपूर येथे मोफत वयोवृद्ध लोकांसाठी शिबिरात उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
विखे म्हणाले, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांना पक्षात किती किंमत आहे, हे लोकांनाही माहित आहे. ज्यांना सरकार आणि पक्षामध्ये किंमत नाही त्यांचे वक्तव्य बद्दल काय मनावर घ्यायचे ?
पूर्ण ताकतीने सर्व नगरपालिका निवडणुका लढवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे, असेही विखे म्हटले. दरम्यान, विखे यांनी ज्या मंत्र्याबद्दल भाष्य केले, त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही.
तसेच नेमका काय गैरव्यवहार केला, कधी केला, तो कधी बाहेर काढणार, याबाबतही काहीच स्पष्ट केलेले नाही. मात्र त्यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच अनेकांची उत्सुकता ताणली गेली आहे.