कन्नड अभिनेता पुनीत राजकुमारला अखेरचा निरोप.. चाहत्यांना मोठा धक्का

चाहत्यांना त्यांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, अन्...

मनोरंजन - कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार (Puneet Rajkumar) यांना अखेरचा निरोप देण्यात आला. शनिवारी संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अकाली हृदयविकाराने (Heart Attack) निधन झाल्याने कन्नड सिनेसृष्टीसह (Cine Industry) त्यांच्या देशभरातील चाहत्यांना (Fan Club) मोठा धक्का बसला आहे. 

पुनीत यांना शुक्रवारी सकाळी जिममध्ये वर्कआउट (Jim Workout) करत असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने बंगळुरूच्या (Benguluru) एका खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने (Bad News) सिनेविश्वाला धक्का बसला आहे.

त्यांच्या दोन चाहत्यांचे या वृत्ताच्या धक्क्यामुळे निधन झाले. तर एका चाहत्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. दरम्यान, पुनीत यांची मुलगी वंदिता (Vandita Punnet Rajkumar) ही अमेरिकेते असते. ती शनिवारी दुपारी अमेरिकेहून भारतात पोहोचली.  वंदिताला दिल्लीहून बंगळुरूला नेण्यासाठी राज्य प्राधिकरणाने विशेष विमानाची व्यवस्था केली होती.

कर्नाटकातील (Karnataka) चामराजनगर जिल्ह्यातील हनूर तालुक्यात मारो गाव आहे. तेथील एका ३० वर्षीय व्यक्तीला पुनीत यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना तत्काळ हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मुनियप्पा असे या चाहत्याचे नाव असून ते व्यवसायाने शेतकरी (Farmer) होते.

बेळगावच्या शिंदोली गावातील एका चाहत्याचा देखील पुनीत यांच्या निधनाचे वृत्त ऐकून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या सुपरस्टारच्या (Superstar)  मृत्यूची बातमी समजल्यानंतर कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील अथानी येथील एका तरुणाने (Youth) आत्महत्या केली आहे. स्थानिक माध्यमांनी तसे वृत्त प्रसारित केले आहे.

जमावबंदीचे आदेश लागू

पुनीत राजकुमार यांच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यात शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहे (Cinema Halls) बंद करण्यात आली आहेत. पुनीत यांच्या चाहत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त (Police Protection) कडेकोट करण्यात आला आहे.

हे सिनेमे राहिले अपूर्ण

पुनीत हे सध्या चेतन कुमार दिग्दर्शित 'जेम्स' सिनेमाचे शूटिंग करत होते. अॅक्शन एंटरटेनर म्हणून ते कन्नड (Kannada) सिनेसृष्टीत ओळखले जात होते. पुनीत यांनी शूटिंगचा (Shooting) मोठा भाग पूर्ण केला होता. तर या चित्रपटात त्यांच्यासह प्रिया आनंद होती. पुनीत यांना 'द्वित्व'चेही शूटिंग सुरु करणार होते. मात्र, आता हे सिनेमे (Cinema) अपूर्ण राहतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !