'प्रतिक काळे' आत्महत्या प्रकरणात समोर आली 'नवी' माहिती..

अहमदनगर - शुक्रवारी रात्री नगर औरंगाबाद रोडलगत एका शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत युवक आढळला होता. त्याची ओळख पटली असून त्याने नातेवाईकांना सोशल मिडियाद्वारे संदेश पाठवत आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्याच्या मृत्यूप्रकरणी एक नवी माहिती समोर आला आहे.


प्रतिक काळे असे या युवकाचे नाव आहे. तो मुळा एज्युकेशन सोसायटीत नोकरीला होता. काही दिवसांपूर्वी त्याची बदली झाली होती. नंतर काही व्यक्तींनी त्याचा मानसिक छळ केल्याचे त्याच्या बहिणीचे म्हणणे आहे. तिने शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

प्रतिक काळे याला शिक्षण संस्थेतील काही व्यक्ती त्रास देत होत्या. तसेच त्याचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे तो नैराश्यात होता. प्रतिक गडाख कुटुंबियांच्या जास्त जवळ गेला म्हणून त्याचा मानसिक छळ केला. तसेच त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे फिर्यादित म्हटले आहे.

शुक्रवारी रात्री प्रतिकचा मृतदेह नगरच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात आणला होता. परंतु, शनिवारी सकाळी काळे कुटुंबियांच्या मागणीनुसार तो शवविच्छेदन करण्यासाठी औरंगाबाद येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. तत्पूवी एमआयडीसी पोलिसांनी प्रतिकच्या बहिणीची फिर्याद नोंदवून घेतली.

एमआयडीसी पोलिसांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार महेश गोरक्षनाथ कदम, विनायक दमोधर देशमुख, राहुल जनार्दन राजळे, व्यंकटेश नामदेव बेल्हेकर, जगन्नाथ कल्याण औटी, भाऊसाहेब भिमराज शेळके, रितेश बबन टेमक यांच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. 


हेही वाचा -  नगर-औरंगाबाद महामार्गाजवळ आढळला 'त्या' युवकाचा मृतदेह

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !