नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा मातेचे चौथे रुप म्हणजे आई 'कुष्मांडा'ची पूजा केली जाते. या दिवशी माता कुष्मांडाच्या पूजेसाठी लाल आणि नारंगी रंगाचे वस्त्र परीधान करावे. पूजेसाठी पिवळ्या रंगाची फूलं अर्पण करावी. मालपोह्याचा नैवेद्य ठेवावा.
आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते, चारी बाजूला अंधार पसरलेला होतो तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे.
कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, असे सांगितले जाते. ही देवी सिंहावर स्वार होते.
शब्दांकन - दिपाली विजय माळी (अ.नगर)