नाशिक - पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या नाशिक परिक्षेत्रामध्ये (Nashik Division) गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांनी धडाकेबाज मोहिम हाती घेतली आहे. गुन्हेगारी कारवायांचा भाग असलेल्या नशिल्या पदार्थांच्या तस्करीवर, साठ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलिसांनी गेले दोन महिन्यांपासून ही मोहिम हाती घेतली आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत पोलिसांनी तब्बल ७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण १५० गुन्हे नोंदवून २१० संशयितांना अटक केली आहे. (210 suspects arrested)
नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon) आणि अहमदनगर (Ahmednagar) या पाच जिल्ह्यांमध्ये पोलिस उपमहानिरीक्षक शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहिम राबवण्यात आली. ही कारवाई केल्याचे पोलिस उप महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पाचही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते. पोलिस उप महानिरीक्षक बी जी शेखर पाटील (Deputy Inspector General Dr B G Shekhar) यांनी नाशिक परिक्षेत्राचा दि. २४ ऑगस्ट रोजी कार्यभार कार्यभार स्विकारल्यानंतर परिक्षेत्रातील तरुण वर्ग, विद्यार्थी हे हव्यासापायी व थ्रिल म्हणून अवैध पिस्तल किंवा कट्टे बाळगून गुन्हेगारीकडे वळाल्याचे लक्षात आले.
वाढत्या गुन्हेगारीपासून (Crime) समाजाचे संरक्षण हवे या उद्देशाने परिक्षेत्रातील ड्रग्स (Drugs), आर्म (arm), गुटखा विक्री, अवैध लिकर या अवैध समूळ उच्चाटन करण्याकरिता विशेष मोहिम सुरु केली होती. त्यासाठी विशेष पथकेही (Spacial Team) नियुक्त केली होती. या पथकांनी कारवाया केल्या आहेत.
अवैध धंदे, बेकायदा शस्त्रास्त्र बाळगणे तसेच अवैध गुटखा यावर कारवाई करून १५० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर २१० संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ७ कोटी २ लाख २२ हजार ७७१ रुवयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असल्याची माहिती उपमहानिरीक्षक शेखर यांनी दिली आहे.