अहमदनगर - शहर वकील संघटनेच्या (Ahmednagar Bar Association) पदाधिकारी निवडणुकीसाठी आज जिल्ह्य न्यायालयात मतदान (Voting) झाले व सायंकाळी मतमोजणी झाली. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी अनिल सरोदे (Anil Sarode) व उपाध्यक्षपदी संदीप वांढेकर (Sandip Wandhekar) यांची निवड झाली.
अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उमेदवार अनिल सरोदे यांना २५७, संजय पाटील यांना २५५, तर सुधीर टोकेकर यांना ५८ मते पडली.
अटीतटीच्या निवडणुकीत सरोदे यांनी पाटील यांच्यावर दोन मतांनी विजय मिळवला. उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत संदीप वांढेकर यांनी २९२ तर विरोधी अनुराधा येवले यांना २७५ मते मिळवली. वांढेकर यांनी १७ मतांनी विजय मिळवला.
बिनविरोध झालेल्या निवडी - सचिव स्वाती नगरकर, खजिनदार अविनाश बुधवंत, सहसचिव अमित सुरपुरिया, महिला सहसचिव आरती गर्जे, कार्यकारणी सदस्यपदी सागर जाधव व विक्रम शिंदे.
नूतन अध्यक्ष अनिल सरोदे म्हणाले, या निवडणुकीत सर्व वकील सहकाऱ्यांनी केलेल्या अमुल्य सहकार्याने माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेत काम करणार आहे. वकिलांचे प्रश्न सोडवण्य बरोबरच नवनवीन उपक्रम राबवणार आहे.
यावेळी विशेष सरकारी वकील सुरेश लगड, वकील अमोल धोंडे, कृष्णा झावरे, चेतन रोहाकले, अनिता दिघे, राजेश कावरे, माजी अध्यक्ष शहाजी दिवटे, लक्ष्मण कचरे, बाबासाहेब मावळे, योगेश गेरंगे, व्ही. आर. भोरडे, कानिफनाथ पवार, अक्षय कोळसे, उपस्थित होते.