बापरे ! लाचखोर प्रविण मानकरच्या घरात तब्बल 'इतक्या' लाखांचे घबाड

अहमदनगर - वीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेचा मुख्य लेखाधिकारी प्रविण मानकर याला अँटी करप्शन विभागाने अटक केली. त्याच्या घराची झडती घेण्यात आली आहे. यावेळी त्याच्या घरात सापडलेली मोठी रोकड, सोन्या चांदीचे दागिने पाहून अँटी करप्शन विभागाचे पथकही चकीत झाले आहे. 

बुधवारी दुपारी एका ठेकेदाराला बिल मंजूर करण्यासाठी प्रविण मानकर याने वीस हजार रुपयांची लाच मागितली. त्याचवेळी अँटी करप्शन विभागाने सापळा रचून त्याला रंगेहात पकडले. त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

माानकर याच्या घरझडतीमध्ये तब्बल ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड, तब्बल ५४० ग्राम वजनाचे सोन्याच दागिने, तर दीड किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत. यातील रोख रकमेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मानकर याच्या पत्नीकडे चौकशी केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे ही रोकड जप्त केली आहे.

गुरुवारी दुपारी तोफखाना पोलिसांनी प्रवीण मानकर (मूळ रा. फ्यांटसी, उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी) याला विशेष न्यायालयात हजर केले. या गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता त्याला पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.  न्यायालयाने मानकरला दि. २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे करीत आहेत. मानकर याच्या घरात सापडलेले मोठे घबाड पाहून त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे घबाड नेमके आले कोठून, याबाबत अद्याप खुलासा समोर आलेला नाही.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !